शिल्पा शेट्टी बदनामी खटल्यात हायकोर्टाची ब्लॉगर्सवर नाराजी
X
प्रसारमाध्यमांमधून होणारी बदनामी असह्य होत असल्याचे सांगत बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बदनामीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. पारंपारीक प्रसारमाध्यमं एकवेळ नियमाचं पालन करतील परंतू खाजगी ब्लॉगर्स (bloggers) आणि व्ह्लॉगर्स (Vlogers) कसं रोखायचं? या दोन्ही माध्यमाचं वर्गीकरण करुन द्या, असे आदेश हायकोर्टाचे न्यायाधीश गौतम पटेल यांनी शिल्पा शेट्टी यांना दिले आहेत.
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा पोर्नाग्राफी आरोपावरुन तुरुंगात होते. काल न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. दरम्यानच्या काळात अनेक प्रसारमाध्यमं आणि सोशल मिडीयातून शिल्पा शेट्टी यांची बदनामी केल्याचे सांगत वकील अभिनव चंद्रचुड यांच्यामार्फत हायकोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. यामधे द न्युज इंडीयन एक्सप्रेस, इंडीया टिव्ही, फ्री प्रेस जर्नल, एनडीटीव्ही, फेसबुक आणि इस्टाग्राम यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.
शिल्पा शेट्टी यांनी बदनामी करणाऱ्या बहुतेक प्रसारमाध्यमं आणि ब्लॉगर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर बदनामीकारक कंटेन्ट काढून टाकल्याचे मान्य केल्याचं वकिल अभिनव चंद्रचुड यांनी हायकोर्टाला सांगितले.
यावर न्या. गौतम पटेल यांनी बदनामी करणारी पारंपारीक प्रसारमाध्यमं आणि ब्लॉगर्स (bloggers) आणि व्ह्लॉगर्स (Vlogers) याचे वर्गीकरण केले पाहीजे. एकवेळ पारंपारीक प्रसारमाध्यमं ऐकतील परंतू ब्लॉगर्स (bloggers) आणि व्ह्लॉगर्स (Vlogers)ला कसं नियंत्रीत करायचं ? या खटल्याचा निकाल देताना वर्गीकरण उपयुक्त ठरेल अशी टीप्पनी न्या. पटेल यांनी केली.
हायकोर्टाने यापूर्वी बदनामीकारक व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. शिवाय शिल्पा शेट्टी यांच्या बदनामीबरोबरच अशा कंटेटमुळे त्यांच्या मुलांवर काय परीणाम होत असेल असा सवाल देखील उपस्थित केला. कोर्टानं पुढील सुनावणी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलली आहे.