एल्गार परिषद: झारखंडच्या कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी, स्टेन स्वामी यांना रुग्णालयात हलवा
X
कोरेगाव भीमा हिंसाचारामधील एल्गार परिषद प्रकरणात 84 वर्षीय कार्यकर्ते स्टेन स्वामी यांच्याविरोधात युएपीए कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्यांना एनआयए कडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर स्टेन स्वामी हे पार्किंसन या आजाराने ग्रस्त असताना एनआयए ने त्यांची जामीन याचिका फेटाळली आहे. स्टेन स्वामी सध्या महाराष्ट्रातील तळोजा तुरूंगात आहेत.
एल्गार परिषद प्रकरणात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्टेन स्वामी यांना एनआयए ने अटक केली होती. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने झारखंड जन अधिकार महासभेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांनी महाराष्ट्र सरकारला स्टेन स्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे.
या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की...
स्टेन स्वामी पार्किंसन या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांच्या दोन्ही हाताचा थरकाप होत आहे. स्टेन स्वामी यांना 'पाणी पिताना, आंघोळ करताना आणि कपडे धुताना त्रास होत आहे. त्यांना नीट ऐकूही येत नसल्यानं त्यांच्या दोन्ही कानांना मशीन लावण्याची गरज असल्याचं या कार्यकर्त्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांचं हर्नियाच दोन वेळा ऑपरेशन झाल्याचं देखील पत्रात सांगितलं गेलं आहे.
एल्गार परिषद प्रकरणात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्टेन स्वामी यांना एनआयएने अटक केली होती. स्टेन स्वामी यांच्याविरोधात कठोर युएपीए कायद्यांतर्गत आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्टेन स्वामी पार्किंसन सारख्या आजाराने ग्रस्त असल्याने वैद्यकीय कारणास्तव केलेला जमीनाचा अर्ज एनआयएच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
पत्रात सांगितल्यानुसार स्टेन स्वामी यांनी 14 मे रोजी आपल्या सहकार्यांशी फोनवर बोलतांना त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं. ते फोने वर बोलू ही शकत नव्हते, औषधं त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत नसल्याचं ही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितलं होतं.
झारखंड जनाधिकार महासभेने सांगितल्यानुसार - त्यांची कोरोना चाचणी अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस अद्याप पर्यंत घेतलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कार्यकर्त्यांनी स्टेन स्वामी यांना रुग्णालयात हलविण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
आदिवासी, ग्रामसभा, नागरी समाज, अनेक राजकीय नेते, पक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री यांनी देखील या कार्यकर्त्याना पाठिंबा दर्शविला असल्याचे पत्रात म्हटलं आहे.
यापूर्वी, देशात नव्हे तर जगातील 2,500 समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार यांच्यासह अनेकांनी 84 वर्षांच्या स्टेन स्वामी यांना जामीन देण्याचे आवाहन केले होते.
एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 16 शैक्षणिक, वकील आणि कार्यकर्त्यांपैकी स्टेन स्वामी एक आहे.
जून 2018 मध्ये या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली होती. त्यावेळी पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करतत होती, पण महाराष्ट्रात भाजपाचे सरकार पडल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीत एनआयएने या प्रकरणाची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे.