शरद पवारांचा अयोध्या दौरा राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यावर
X
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधींना सुरूवात होणार आहे. यामुळे रामभक्तांची उत्सुकता देखील वाढली आहे. संपूर्ण देश भारत भक्तीमय वातावरण झालं आहे. दरम्यान अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन प्रसंगी खास मान्यवरांना आमंत्रण पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यांनीही 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती या पत्राद्वारा दिली आहे. श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना त्यांनी पत्र लिहलं आहे. 22 जानेवारी नंतर थोडा वेळ काढून शांतपणे आपण दर्शनाला येऊ तो पर्यंत मंदिराचे कामही झालेले असेल असे ते यापत्रात म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की "22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल जाणून घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल कृतज्ञ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या भक्तीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील उत्सवाबाबत रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि उत्साह असून ते मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक घटनेचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. 22 जानेवारी रोजी उत्सव पूर्ण झाल्यानंतर, श्रीरामलल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल.अयोध्येला येण्याची नियोजन आहे, त्यावेळी मी भक्तीभावाने श्रीरामल्लाजींचे दर्शन घेईन. तोपर्यंत राममंदिराचे बांधकामही पूर्ण झाले असेल असं या पत्रातून पवार म्हणाले आहे.