Jalna Protest : मराठा आंदोलक आक्रमक ; शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीची तोडफोड
X
जालना येथील मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यबर उमटले आहेत. या आंदोलनानंतर काही ठिकाणी हिंसाचाराचे वळन लागले आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले असले तरी अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याच चित्र समोर आलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शरद पवार जाणार असल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा एक पथक त्यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञात लोकांनी डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच गाडीला लाथा मारून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. वाढता जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.