शरद पवार धमकी प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, “शासनाची जबाबदारी…”
तुमचा दाभोलकर करू म्हणत जीवे मारण्याच्या धमकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रियेस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
X
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली.सौरभ पिंपळकर अस धमकी देणाऱ्या व्यक्तीच नाव होत तर त्या ट्वीटरवर 'मी भाजपचा कार्यकर्ता' असा उल्लेख होता. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. आता स्वतः शरद पवारांसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, “राज्याच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र प्रशासनावर आहे.”
दरम्यान शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, असं फडणवीस म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar) यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा," असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांना दिला आहे.
तर “महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तुत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे”
“महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था सांभळणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तुत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.