Home > News Update > शरद पवारांचा पुन्हा एकदा राज्यपालांवर वार

शरद पवारांचा पुन्हा एकदा राज्यपालांवर वार

राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील वादाचे अनेक अध्याय महाविकास आघाडी सरकार स्थापने पासून पार पडलेत. सरकार आणि राज्यपालांमध्ये सतत काही ना काही विषयांवरुन वादविवाद सुरु असतात. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा उडी घेतलीय. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी खरमरीत पत्र लिहून उत्तर दिले आहे.पवारांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यपालांवर चांगलीच टोलेबीजी केली आहे.




या पत्रात पवारांनी म्हटलं आहे की, पुस्तकात मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधी प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, असा टोला पवारांनी लगावला आहे.पत्रात म्हटलं आहे की, पुस्तकात एखाद दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, अशा शब्दात शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल आणि महाविकासआघाडीतील वाद तयार नाही. त्यातच बारा राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे अहवाल भविष्यात कुठे घेऊन जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 28 Oct 2020 5:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top