राज्य सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही - शरद पवार
Max Maharashtra | 9 May 2019 5:21 PM IST
X
X
सातारा - राज्य सरकार दुष्काळप्रश्नी अजूनही गंभीर नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सातारा येथे केली, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला राजकारण करायचे नाही मात्र शेतक-यांना मदत मिळाली पाहिजे हा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आचारसंहिता आहे म्हणून निर्णय घेण्यास विलंब लावणे योग्य नाही. दुष्काळप्रश्नीच तातडीने निर्णय घेतले गेले पाहीजेत, ते घेतले गेले नाहीत. जे निर्णय घेतले गेले ते वास्तवतेला धरून नाहीत. कडब्याचे भाव बघितले तर सरकार चारा छावणीतील एका जनावराला 90 ते 95 रूपये देत आहे ते न परवडणारे आहे. म्हणून मी भाष्य केले, महसुल मंत्र्यांवर टीका केली नाही. दुष्काळप्रश्नी जे निर्णय घेतले गेले आहेत. त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी आम्ही पक्षाची बैठक घेतली. प्रमुख लोकांची टिम तयार केली. घेतलेल्या निर्णयामध्ये दुरूस्ती सुचविण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यासह आणखी काही जण गेले होते. या प्रश्नालचे राजकारण करायचे नाही. फक्त राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावे एवढा हेतू होता असे पवार यांनी यावेळी सांगितले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी ही व्यक्ती आज हयात नाही. ज्या कुटूंबातील दोन व्यक्ती देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्यांच्या हत्या झाल्या. एवढा मोठा त्याग देशासाठी केल्यानंतर त्यांच्याविषयी अशी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरणे हे त्यांना शोभादायक नाही. प्रधानमंत्री हे अधिक महत्वाचं पद आहे. त्या पदाने अधिक काळजी घ्यायची असते. पण घेतली जात नाही. रोज अशा प्रकारची भाषणे मोदींकडून केली जातात. हे चांगलं लक्षण नसल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली.
Updated : 9 May 2019 5:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire