शरद पवारांचं 5 राज्यांच्या निकालाबाबत केलेलं भाकीत अखेर तंतोतंत खरं ठरलं...
X
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांसदर्भात 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना भाकीत केलं होतं. त्यानुसार 5 राज्यांचा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. शरद पवार यांनी आसाम वगळता भाजपला कुठल्याही राज्यात सत्ता स्थापन करता येणार नाही. असं भाकीत केलं होतं. त्यानुसार 5 राज्याच्या निवडणुकीचे कल पाहता. शरद पवार यांनी केलेलं भाकीत खरं ठरल्याचं दिसून येतं.
पाच राज्यांमध्ये कोण मारणार बाजी, ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? असा प्रश्न शरद पवार यांना करण्यात आला होता. यावर पवार यांनी 14 मार्चला राष्ट्रीय प्रश्नावर पत्रकारांशी बातचित करताना देशात होणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकासंदर्भात नक्की जनतेचा कल काय आहे. याबाबत भाष्य केलं होतं. देशात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेश येथे निवडणूक नुकतीच पार पडली.
केरळ...
केरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. आज राज्य त्यांच्या हातात आहे. या राज्यात आम्हाला क्लिअर कट बहुमत मिळेल यामध्ये शंका नाही.
तामिळनाडू...
तामिळनाडूची आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलीन डीएमके यांच्या बाजूनं आहे. ते उद्या राज्याचं सूत्र हातामध्ये घेतील. आणि लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठींबा देतील.
पश्चिम बंगाल
केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा गैरवापर करुन त्या ठिकाणी एक भगीनी आपल्या राज्यातील लोकांच्यासाठी संघर्ष करत आहे. तिच्यावर सगळ्यांनी एक प्रकारचा राजकीय हल्ला करण्याचा त्या संबंधीची भूमिका घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी असतात. बंगाली संस्कृतीवर कोणी आघात केला तर सर्व राज्य एकत्र होतं. त्यामुळं कोणी काही म्हणत असलं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार येईल याची मला खात्री आहे.
आसाम...
आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक दृष्टया चांगली आहे. म्हणजे एका ठिकाणी भाजपची सत्ता येईल. इतर राज्यात भाजपचा पराभव होईल. हा नवीन ट्रेंड देशाला दिशा देईल.
असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं.