Home > News Update > महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे: शरद पवार

महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे: शरद पवार

महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे: शरद पवार
X

'नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकं भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघ 5 दशकं भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असंच या निकालातून पाहायला मिळत आहे', असं शरद पवार म्हणाले.

'चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता', असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.


Updated : 4 Dec 2020 11:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top