#FarmerProtest : हे कायदे तुम्हाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, पवारांचा मोदींना इशारा
X
मोदी सरकारने आणलेले केंद्रीय कृषी कायदे अन्याय्य आहेत आणि त्याविरोधात शेतकऱ्यांनी उभा केलेला संघर्ष पाहता हे कायदे सरकारला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. राज्यपालांना कंगना रानावतला भेटायला वेळ आहे, पण आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे राज्यपाल भेटले, अशी टीका शरद पवार यांनी राज्यपालांवर केली आहे.
ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची अस्था आहे का? शेतकऱ्यांची पंतप्रधानांनी चौकशी केली का? असे खडे सवालही शरद पवारांनी उपस्थित केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.