Home > News Update > शरद पवार दुसऱ्यांदा ब्रीच कँडीमध्ये दाखल

शरद पवार दुसऱ्यांदा ब्रीच कँडीमध्ये दाखल

शरद पवार दुसऱ्यांदा ब्रीच कँडीमध्ये दाखल
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उद्या सोमवार दिनांक १२ एप्रिल २०२१ ला त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 


गेल्या आठवड्यात पवार यांच्या पोटात वेदना जाणवल्यानं त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्त्यांच्या पोटातील पित्ताशयाचे खडे इंन्डोस्कोपीद्वारे काढण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर पवार यांच्यावर आता दुसरी शस्त्रक्रिया केली जाणार.

Updated : 11 April 2021 5:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top