Home > News Update > शैलेंद्र : क्रांतिकारी जन चेतनेचा प्रतिभावंत गीतकार शायर

शैलेंद्र : क्रांतिकारी जन चेतनेचा प्रतिभावंत गीतकार शायर

शैलेंद्र : क्रांतिकारी जन चेतनेचा प्रतिभावंत गीतकार शायर
X

प्रतिभावंत गीतकार, शायर शेलेंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रा. सचिन गरुड यांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश नक्की वाचा….

प्रतिभावंत गीतकार शायर शैलेंद्र शैलेंद्र (जन्म: 30 ऑगस्ट, 1923-मृत्यू :14 डिसेंबर 1966, पूर्ण नाव : शंकरदास केसरीलाल उर्फ ​​शैलेंद्र) शैलेंद्र हे भारतीय हिंदी कवी आणि चित्रपट गीतकार होते.तथापि ते अत्यंत प्रतिभावान मार्क्सवादी शायर होते. स्वांतत्र्योत्तर भारतात हिंदी सिनेमात त्यांची समाजवादी जाणिवेची प्रभावी गीते अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यांनी कधीही चित्रपटाच्या मागणीखातर कसलीही गीते लिहून देण्यास नकार दिला.त्यांच्या गीतात वर्गीय आशय थेट व्यक्त होतो. परंतु ते दलित जातीय असूनही ठोस आंबेडकरी जाणिवेप्रमाणे जातीय दुःखाच्या आशयाचे व विद्रोहाचे भान तीव्रतेने त्यांच्या चित्रपट गीतांमधून व्यक्त करू शकले नाहीत. तशी संधीही त्यांना कधी मिळू शकली नाही. कारण हिंदी सिनेमावर उत्तर भारतीय उच्चजातीय समजघटकाचे वर्चस्व होते. त्यांनी जातीऐवजी वर्गभेदाचे चित्रण करण्यावर हेतुत: अधिक भर दिला.जातीय आशय असलेले सिनेमे त्याकाळी कोणीही बनवण्याची हिम्मत दाखवू शकले नाही. वर्ग संघर्ष अस्फुटपणे दर्शविणाऱ्या चित्रपटांना शैलेंद्रनी धारदार अर्थ असलेली गाणी लिहून त्याची परिणामकारकता अधिक तीव्र केली. हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य होते.शैलेंद्र भारतातील महान दलित कवी म्हणून उदयास आले. त्यांनी जातीभेदावर आवाज उठवला. पण समाज आणि साहित्यिकांनी त्यांना केवळ हिंदी चित्रपट गीतकाराच्या बंदिस्त प्रतिमेतच पाहिले आहे. शैलेन्द्र यांचे डॉ. आंबेडकरांच्या चळवळीविषयी काय भावना होत्या,याचे मला काहीही संदर्भ उपलब्ध झालेले नाही.पण कायमच डाव्या चळवळीशी जोडलेले राहिले आहेत. शंकर शैलेन्द्र हे अत्यंत चांगले हॉकी खेळाडू होते, पण खेळात त्यांचा हीन जातीय म्हणून अपमान झाला आणि त्यांना तो खेळ कायमचा सोडून दिला १९५५ मध्ये त्यांनी लिहिलेला 'न्यौता और चुनौती ' हा गीतसंग्रह त्यांनी कॉ. अण्णा भाऊ साठे यांना अर्पण केला होता. शैलेन्द्र आयुष्याच्या अखेरीपर्यंत कम्युनिस्ट कार्यकर्ता राहिले. इप्टा व प्रगतीशील लेखक संघाशी ते जोडलेले होते. अण्णा भाऊंप्रमाणे त्यांचा अल्पायुष्यात मृत्यू झाला.रशियात अण्णा भाऊ व शैलेन्द्र हे दोनच मोठे लोकप्रिय कलावंत राहिले आहे."आवारा हूँ" हे त्यांनी लिहिलेले गाणे भारतातील पहिले सार्वत्रिक गाणे ठरले. जवळपास 15 देशांनी या गाण्याचे त्यांच्या स्वतःच्या भाषेत भाषांतर केले आहे. रशियामध्ये हे गाणे आजही ऐकले आणि गायले जाते.

निर्वाहासाठी शैलेंद्र यांना गीतलेखनाचा आधार घ्यावा लागला. तोही तुटपुंजा होता.पण त्यांनी आपल्या मार्क्सवादी निष्ठेशी कधीही प्रतारणा केली नाही.

राज कपूरच्या सिनेमाची अत्यंत अर्थपूर्ण सुंदर गीते त्यांनीच लिहिली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली.‘अनाडी’, ‘जगते रहो’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘संगम’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’ यांसारख्या चित्रपटांमध्ये शैलेंद्रने राज कपूरसाठी एकापेक्षा एक गाणी लिहिली. शैलेंद्रच्या या गीतांनी तत्कालीन भारताचे समाजवादी भान घडवले आहे . त्यांची काही लोकप्रिय गीते पुढीलप्रमाणे-

आवारा हूँ (श्री ४२०)

रमैया वस्तावैया (श्री ४२०)

मुड मुड के ना देख मुड मुड के (श्री ४२०)

मेरा जूता है जापानी (श्री ४२०)

आज फिर जीने की (गाईड)

गाता रहे मेरा दिल (गाईड)

पिया तोसे नैना लागे रे (गाईड)

क्या से क्या हो गया (गाईड)

हर दिल जो प्यार करेगा (संगम)

दोस्त दोस्त ना रहा (संगम)

सब कुछ सीखा हमने (अनाडी)

किसी की मुस्कराहटों पे (अनाडी

सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है (तीसरी कसम)

दुनिया बनाने वाले (तीसरी कसम)

"जाने कैसे सपनों में खो गई अंखियां" (अनुराधा)

ऐ मेरे दिल कहीं और चल ग़म की दुनिया से दिल भर गया

दिल का हाल सुने दिलवाला सीधी सी बात न मिर्च मसाला

दिल अपना और प्रीत पराई किसने है रीत बनाई

पूछो न कैसे मैंने रैन बिताई

प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यों डरता है दिल

तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना

भैया मेरे राखी के बंधन को निभाना

मैं गाऊं तुम सो जाओ सुख सपनों में खो जाओ

है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन

जिस देश में गंगा बहती है

मो से छल किये जाय सैयां बेईमान

ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार लाई

सजनवा बैरी हो गए हमार

मेरा नाम जोकर या राज कपूरच्या सिनेमातील 'जीना यहां, मरना यहां' हे गीत शैलेंद्र यांच्या मुलाने, शैली शैलेंद्रने लिहिले.पहिले कडवे फक्त शैलेंद्रने लिहिले होते असे म्हणतात.या गीताचा मुखडाच ते लिहू शकले, पण दरम्यान त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाने - शैलीने ते गीत अत्यंत प्रतिभेने पूर्ण करून राज कपूरला दिले. पिता-पुत्रांनी लिहिलेले हे अत्यंत असामान्य लोकप्रिय गीत होते...

वर दिलेली गीतांची मोजकी यादी आहे. पण शैलेन्द्र यांनी विपुल प्रमाणात कविता आणि गीते लिहिली आहेत. त्याची थोडीफार माहितीही अलीकडच्या माहिती विस्फोटाच्या काळातच बाहेर पडू लागली आहे.

सन २०२३ हे गीतकार व कवी शैलेन्द्र यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. हा विद्रोही साहित्यिक, गीतकार जातीने 'अस्पृश्य ' होता. तो ज्या डाव्या चळवळीत आजीवन निष्ठेने कार्यरत होता , त्यांनाही त्याची 'जात' माहित नव्हती. शैलेन्द्रही आपली ही जातओळख लपवून वर्गवादी बनला होता. असा आता आरोप लावला जात आहे.अपवाद वगळता त्याच्या बहुतेक डाव्या सहकाऱ्यानाही त्याची जात माहित नव्हती. तरीही त्याची उपेक्षा झाली ती झालीच

शैलेन्द्रला यावर्षात ज्ञानपीठ देणे अधिक उचित ठरेल. पण संघ-भाजपच्या राजवटीला व्होटबँकेसाठी तर त्याची उपयोगिता नाहीच.आणि सांस्कृतिक राजकारणासाठी तो डावा असल्याने गैरेसोयीचा...पुरस्काराने फारसे काही साध्य होत नाही, असे मला वाटते. हा माझा निराशावादी नकारात्मक विचार आहे, असे अनेकांना वाटू शकेल.अर्थशास्त्राचे नोबेल कधीच डाव्या मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञाला मिळालेले नाही... अद्याप ज्ञानपीठ भारतातील आंबेडकरवादी दलित वा मार्क्सवादी डाव्या साहित्यिकाला मिळालेले नाही...संघ-भाजपच्या सत्ताकाळाचे सोडा, साठ वर्षात कॉंग्रेसच्या काळात तरी कुठे हे मिळाले आहे....?

प्रा. सचिन गरुड

Updated : 17 Dec 2024 5:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top