Home > News Update > #Chhatrapati संभाजीराजेंचं चुकलं कुठं ? शाहू छत्रपतींनी दिली स्पष्टोक्ती

#Chhatrapati संभाजीराजेंचं चुकलं कुठं ? शाहू छत्रपतींनी दिली स्पष्टोक्ती

#Chhatrapati संभाजीराजेंचं   चुकलं कुठं ? शाहू छत्रपतींनी दिली स्पष्टोक्ती
X

राज्यसभा निवडणुकीत करून राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली असताना छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhaji ) यांनी उमेदवारी मागे घेत शिवसेनेला दोष दिला आहे.संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती ( shahu chatrapati)यांनी मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोणताही दोष न देत मी अजूनही शिवसेनेत असल्याचं जाहीर केलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं बोट दाखवलं आहे.

शाहू छत्रपती म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thakare) संभाजीराजेंना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असून, छत्रपती घराण्याचा आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी सन्मान केला आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारीपासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना भूमिका मांडायला वेळ होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभे राह, आम्ही पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात किती तथ्य आहे, हे मला माहिती नाही.

संभाजीराजेंनी फडणवीसांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही भेट घ्यायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. संभाजीराजेंनी २००९ नंतर जे समाजकारण आणि राजकारण केलं त्याबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही. त्यांचे निर्णय हे व्यक्तीगत स्वरूपाचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कच्चा मसुदा तयार झाल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, हा मसुदा कच्चा होता, अंतिम नव्हता. नंतर वाटाघाटी फिसकटल्याने शिवसेनेकडून कोल्हापुरातील संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली.

संजय पवारांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा निर्णय अतिशय चांगला आहे. मागील अनेक वर्ष पवार हे शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी स्वतः त्यांचे अभिनंदन केले. खासदारकी मिळवायाची असेल तर त्या पक्षाचे नियमही सोबत येतात. शिवसेनेत जायचे असेल तर शिवबंधन घालावे लागेल. हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असल्यामुळं तो पाळावा लागतो.

संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात होते. संभाजीराजेंनी यानंतर स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकारण करण्याची घोषणा केली होती. तसेच, पुढील विधानसभा निवडणुका या संघटनेच्या माध्यमातून लढवण्याचे जाहीर केले होते.

Updated : 28 May 2022 5:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top