Its Not OK ... शहाजी बापू थोडक्यात बचावले.
X
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय' या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत बुधवारी दुर्घटना घडली .गुवाहाटीत बंडखोर आमदार राहत होते तेंव्हा त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मुळे ते प्रचंड व्हायरल झाले.अख्या महाराष्ट्राने त्यांचा डायलॉग उचलून धरला. त्यांच्या मुंबईतील आमदार निवासात खोलीत बुधवारी रात्री अपघात झाला .
दिवसभरातील सर्व कामकाज संपल्यानंतर शहाजीबापू स्वतःच्या आमदार निवासातील खोलीवर आले . त्यांनी दरवाजा उघडला आणि त्या खोलीचं छत कोसळलं.विशेष म्हणजे खोलीचा स्लॅब शहाजी बापूंच्या बेडवरच कोसळला . त्यामुळे मोठ्या दुर्घटनेतुन शाहजी बापू वाचले आहेत.
दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडली आहे. यापूर्वी मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या. "बुधवारी रात्री ते रुमवर आले त्यांनी दरवाजा उघडला आणि स्लॅब खाली कोसळला. ते थोडक्यात बचावले. त्यानंतर आमदार निवासात रात्री दुसरी खोली आम्ही मॅनेज केली. पण रात्रभर आम्हाला खूप त्रास झाला."अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळाली आहे.