Home > News Update > शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन सिंगापूर इथे

शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन सिंगापूर इथे

रजिया सुलताना संमेलनाध्यक्ष, मनोज भोयर उदघाटक

शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन सिंगापूर इथे
X

रजिया सुलताना संमेलनाध्यक्ष, मनोज भोयर उदघाटक

शब्द परिवारातर्फे सिंगापूर इथे नववे मराठी विश्व मराठी साहित्य संमेलन १४ ते १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या संमेलनाध्यक्ष असून ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. यावेळी रजिया सुलताना यांची मुलाखत ज्येष्ठ कवयित्री शशी डंभारे घेणार आहे. याशिवाय दोन कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातले मान्यवर कवी आणि कवयित्री सहभागी होत आहेत. वेगवगेळ्या विषयांवर परिसंवाद, प्राध्यापकांच्या शोध निबंधांचे सादरीकरणही होणार आहे.

मराठीतून समजून घ्या सिंगापूर

'सिंगापूर देशाची जडणघडण' या विषयावर मुंबईचे ऍड. सतीश बोरुलकर यांचं व्याख्यान हे श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. 'पुढच्या पिढीच्या दृष्टीने भारत आणि सिंगापूर' या विषयाला अनुसरून दिल्लीच्या सुहानी राणा, मुंबईच्या साक्षी डंभारे आणि अहमदनगरच्या अंजली खोडदे यांच्याशी संवादही साधला जाणार आहे.

मान्यवरांच्या पुस्तकांचेही प्रकाशन

पुण्याच्या लेखिका आणि चपराक मासिकाच्या उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे यांचा 'ओव्हरटेक' हा गुडकथा संग्रह, इंदोरचे डॉ.अनिल गजभिये यांचा

'अस्मितादर्शी समीक्षा' हा समीक्षा ग्रंथ, संमेलनाध्यक्ष रजिया सुलताना यांच्या 'गौतम बुद्धांच्या बोधकथा', कोकण भवन इथे कार्यरत माहिती कार्यालयाच्या उपसंचालिका अर्चना शंभरकर -गाडेकर यांच्या 'सरिनास -स्टोरी बोर्ड ' आदी पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा या संमेलनात होणार असल्याचे 'शब्द' परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांनी कळविले आहे.

सहभागी रसिक श्रोत्यांसाठी वर्ध्याच्या ज्योती भगत यांच्या खुमासदार निवेदनासहित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण सिंगापूर शहराची सफर हे या संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे.

यापूर्वीचे संमेलनाध्यक्ष कोण ?

'शब्द' परिवाराचे हे नववे साहित्य संमेलन असून यापूर्वी माँरिशस, मलेशिया, बँकाक, इंडोनेशिया, दुबई, श्रीलंका, मालदीव, नेपाळ आदी देशात संमेलने आयोजित करण्यात आले होते. अभिनेते आणि कवी किशोर कदम, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख , संपादक आणि लेखक संजय आवटे, साहित्यिक डॉ. अनिल गजभिये, लेखक सिद्धार्थ भगत, प्रा. नागनाथ पाटील, लेखक आणि ज्येष्ठ समाजसेवक दगडू लोमटे आदींनी वेगेवगेळ्या देशात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.

Updated : 11 Jan 2025 4:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top