Serum Institute Fire: सिरम इन्स्टिट्यूटला आग, कोव्हिशिल्ड सुरक्षित
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Jan 2021 6:00 PM IST
X
X
देशाला कोरोनाची लस (कोव्हिशिल्ड) देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील नवीन बिल्डिंगला आहे लागली असून आगीचं कारण अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: या ठिकाणी भेट दिली होती. सीरम च्या या इमारतीत लस तयार केली जात नाही.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, इतर लसीच्या उत्पादनावर या आगीमुळे काही परिणाम होईल का? हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. सध्या ही आग मोठ्या प्रमाणात असल्याचं धुरावरून तरी स्पष्ट झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या रवाना झाल्या आहेत. दुपारी दीड वाजताची घटना आहे. ही आग मांजरी येथील इन्स्टिट्यूटला लागली असून या इमारतीच्या एका भागाला ही आग लागली आहे. या आगीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.
Updated : 21 Jan 2021 6:02 PM IST
Tags: Serum Institute covid vaccine
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire