Home > News Update > ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची झुंज अपयशी

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची झुंज अपयशी

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची झुंज अपयशी
X

आपल्या शांत अँकरिंगमधून बातमी आणि त्याचे विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. दुआ यांच्यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून ICU मध्ये ठेवण्यात आले होते. २९ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खूपच बिघडल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआ हिने आपल्या वडिलांची तब्येत खालावल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर सातत्याने त्यांच्या प्रकृती बद्दल अफवा पसरत होत्या. पण अखेर मल्लिकानेच आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जायका इंडियाका या आपल्या फूड अँड ट्रॅव्हल शोमधून त्यांनी देशातील विविध भागांचे दौरे केले आणि तिथली चव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निर्भय आणि असामान्य असलेले आमचे वडील विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते असामान्य जीवन जगले. निर्वासितांच्या एका वस्तीपासून ते गेली ४२ वर्ष पत्रकारितेत राहिले. पत्रकारितेच्या शिखरावर जाऊन त्यांनी काम केले. सत्तेला न घाबरता ते कायम खरं बोलत राहिले. आता स्वर्गात माझी आई आणि त्यांची पत्नी चिन्ना यांच्यासोबत ते असतील. तेथे ते एकमेकांच्या सोबतीनं गाणी गातील, स्वयंपाक बनवतील आणि प्रवास करतील, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Updated : 4 Dec 2021 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top