जाएंट किलर एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
X
दक्षिण मध्य मुंबईत लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव करून जाएंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते माजी खासदार राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचे करोनामुळं आज निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चैत्यभूमी येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद देखील भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता. एकनाथ गायकवाड शेवटपर्यंत काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक राजकीय क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आहे.