महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला :शिवसेनाच्या खासदारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी
राज्यात सत्तेत एकत्र असूनही महाविकास आघाडीत कुरबुरी सुरुच आहेत. आता अहमदनगर मधे सेना खासदारानं राष्ट्रवादी मंत्र्यावर कारवाईची मागणी केली आहे. अहमदनगर वरुन सुनिल भोंगळ यांचा रिपोर्ट..
X
सुनिल भोंगळ
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्या कामांची पाहणी करताना शिवसेनेच्याच खासदार लोखंडे यांना डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं आहे की, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना गर्दी न करण्याचे आदेश आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते मग अधिकारी आणि मंत्र्यांवर का नाही?
गेल्या पाच दशकापासून जिल्ह्यातील शेतकरी ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. मात्र मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना काही निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना-राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान आढळा नदीवरील सेतू पुलाची पाहणी करते वेळी या कामासाठी निधी कमी पडणार अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
सुनिल भोंगळ