Home > News Update > जर्मनीतील डॉक्टोरल फेलोशिपसाठी कोल्हापूरच्या सागर कांबळे यांची निवड

जर्मनीतील डॉक्टोरल फेलोशिपसाठी कोल्हापूरच्या सागर कांबळे यांची निवड

जर्मनीतील डॉक्टोरल फेलोशिपसाठी कोल्हापूरच्या सागर कांबळे यांची निवड
X

कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळे वारूण येथील सागर कांबळे सध्या मुंबई विद्यापीठात पीएच.डी. संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नुकतीच बर्लिन, जर्मनी येथील फ्राई युनिव्हर्सिटीमध्ये प्रतिष्ठित डॉक्टोरल फेलोशिप मिळाली आहे. या एक वर्षाच्या नामांकित फेलोशिपच्या माध्यमातून सागर ‘कॉंटेस्टेशन्स ऑफ द लिबरल स्क्रिप्ट’ या संशोधन प्रकल्पात योगदान देणार आहेत. यासाठी त्यांचा संपूर्ण खर्च जर्मन रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील सागर कांबळे यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी कोल्हापूरातून कला शाखेतील पदवी प्राप्त केली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, सागर यांनी त्यांचे शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले आहे. सागर यांची निवड ही वंचित घतकातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

सागर सध्या ते मुंबई विद्यापीठातील नागरिकशास्त्र आणि राजकारण विभागात प्रा. हर्षद भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संशोधन करीत आहेत. त्यांचे संशोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि जर्मन तत्त्वज्ञ व सामाजिक सिद्धांत्कार युगेन हाबरमास, यांच्यातील तुलनात्मक राजकीय विचारांच्या अभ्यासावर केंद्रित आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा जागतिक गव्हर्नर्स आणि अभ्यासक्षेत्रात समावेश करण्याची उपयुक्तता हा माझ्या संशोधन आणि लेखनाचा उद्देश आहे. या फेलोशीपच्या माध्यमातून त्यासाठी ही संधी मिळत आहे असे सागर कांबळे यांनी सांगितले.

Updated : 26 July 2024 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top