Home > News Update > 'ऑक्सिजन नाही' अशी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीची संपत्ती जप्त करा: योगी आदित्यनाथ

'ऑक्सिजन नाही' अशी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीची संपत्ती जप्त करा: योगी आदित्यनाथ

ऑक्सिजन नाही अशी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीची संपत्ती जप्त करा: योगी आदित्यनाथ
X

देशात ऑक्सिजनची कमतरता असली तरी उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कुठलीही कमतरता नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला आता आदेश दिले आहेत की, जो कोणी ऑक्सिजन नाही. असं सोशल मीडियावर लिहिलं... त्याची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार संपत्ती जप्त केली जाईल.

योगींच्या मते उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही. लोक अफवा पसरवत असून खोटा प्रोपोगंडा चालवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करा.

योगी आदित्यनाथ यांच्या मते ऑक्सिजनची सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये कोणतीही कमतरता नाही. खरी समस्या काळ्याबाजाराची आणि जमाखोरीची आहे. या विरोधात सक्तीने पाऊल उचलली जात आहेत.

ऑक्सिजनचं ऑडिट करणार...

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी विविध माध्यमांच्या संपादकांशी बोलताना आईआईटी कानपुर, आईआईएम लखनऊ आणि आईआईटी बीएचयू यांच्या साहाय्याने सरकार ऑक्सीजन चं ऑडिट करणार असल्याची माहिती दिली. प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन ची गरज नसते. याची माहिती माध्यमांनी समाजाला द्यायला हवी. अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Updated : 25 April 2021 12:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top