Home > News Update > देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य बड्या नेत्यांसह राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात...

देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य बड्या नेत्यांसह राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात...

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य बड्या नेत्यांसह राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात...
X

राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी देखील काढून घेतली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, केंदीय मंत्री रामदास आठवले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका आहे असा अहवाल दिला होता. तरी देखील सरकारने त्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. तर राज ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. ती काढून त्यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोणकोणत्या नेत्यास पूर्वी कोणती सुरक्षा होती आणि आता कोणते बदल करण्यात आलेत :

डणवीस यांना पुर्वी झेड प्लस सुरक्षा होती ती आत्ता वाय प्लस करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ताफ्यात असणारी बुलेट प्रूफ कार देखील काढून घेण्यात आली आहे.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय प्लस होती ती आत्ता एक्स दर्जाची करण्यात आली आहे.

आशिष शेलार आणि राम नाईक यांना पूर्वी वाय प्लस होती ती आता वाय दर्जाची करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती जी आता वायप्लस दर्जाची करण्यात आली आहे.

रामदास आठवलेची वाय प्लस सुरक्षा आता विना एस्कॉर्ट शिवाय असेल.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( वायप्लस एस्कॉर्टसह), सुधीर मुनगंटीवार ( वायप्लस, झेड नागपूर), रावसाहेब दानवे ( वाय प्लस), राम कदम (एक्स), माधव भंडारी( एक्स) आणि खासदार नारायण राणे (वायप्लस) यांच्या सुरक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत.


Updated : 10 Jan 2021 1:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top