संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, घराबाहेर कडक सुरक्षा
X
केला काही दिवसात शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद विकोपाला पोहोचला आहे. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे. त्यात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद रॅलीवर देखील टीका केली होती, तसेच राणे यांच्या अटकेचे समर्थन केले होते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे, या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपमध्ये वाढलेला हा तणाव पाहता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्तमध्ये वाढ करण्यात आल्याची चर्चा आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानात जवळील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आणि संजय राऊत यांची भेट देखील घेतली.