Home > News Update > गेल्या वर्षी पेक्षा कोरोना महामारी यंदा अधिक घातक ठरणार, भारतात परिस्थिती चिंताजनक डब्ल्यूएचओ

गेल्या वर्षी पेक्षा कोरोना महामारी यंदा अधिक घातक ठरणार, भारतात परिस्थिती चिंताजनक डब्ल्यूएचओ

गेल्या वर्षी पेक्षा कोरोना महामारी यंदा अधिक घातक ठरणार, भारतात परिस्थिती चिंताजनक डब्ल्यूएचओ
X

जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या वर्षापेक्षा यंदा कोरोनाची महामारी जास्त घातक राहणार असल्याचं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओ चे डायरेक्टर टेड्रोस एदानोम गेब्रेसस (WHO Director General Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली असून त्यांनी या वर्षी कोरोना महामारी गेल्यावर्षी पेक्षा अधिक घातक राहणार असल्याचं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओ च्या माहितीनुसार जगभरात 33 लाख 46 हजार हजारांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

भारताबाबत चिंता

माध्यमं एजंसीच्या मते WHO च्या प्रमुखांनी भारताच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून भारतात कोरोनाची स्थिती खूपच वाईट आहे. काही राज्यांची स्थिती अधिकच वाईट आहे. रुग्णालयात अनेक रुग्ण भरती होत असून मृत्यूची संख्या वाढली आहे.

दरम्यान राज्यात 14 मेला 53 हजार 249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज 395 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 47,07,980 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,09,215 (17.35 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,१९,२५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Updated : 15 May 2021 9:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top