महापालिकेचा यांत्रिक दुरुस्ती खर्चही वाचणार...
X
मल निःसारन मैल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महाराष्ट्रातील पहिल्या संयुक्त शास्त्रोक्त मलप्रक्रिया प्रकल्पाचे इकोसॅन फाउंडेशनने तयार केलेला प्रकल्प आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आला. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सांगलीत सुरू करण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून 'ड' वर्ग महापालिकेसाठी महा अर्बन 'इनो वॉश' चॅलेंज स्पर्धा होती. या स्पर्धेत 10 पेक्षा अधिक महापालिका सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सांगली महापालिकेने इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे शास्त्रोक्त पद्धतीने संयुक्त मलप्रक्रिया करण्याचे 20 जून 2022 रोजी सादरीकरण करण्यात आले. यानंतर 29 जून 2022 रोजी सांगली महापालिका, भिवापूर आणि अलिबाग याची निवड करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. या प्रकल्पामध्ये मलनिःसारण वाहनातून संकलित केलेला मल हा स्क्रिनिंग करून पाणी आणि घट्ट मैल्याचे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण केलेले पाण्याचे हे सांडपाण्यासोबत शुध्दीकरण केले जाते. तसेच घट्ट मैला हा सेट्रीफ्यूज घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे खत म्हणून वापर करता येतो. त्यामुळे पूरबाधीत किंवा आजूबाजूच्या भागासाठी वेगळा मलप्रक्रिया केंद्र बांधण्याचा महापालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच यंत्र सामग्री देखभाल दुरुस्तीच्या खर्चामध्ये कपात झाली आहे. यामध्ये एकूण महापालिकेचे सव्वा ते दीड कोटी रुपये वाचले आणि यंत्र सामुग्रीचा देखभाल खर्चही वाचला आहे.
आज हा प्रकल्प महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. यावेळी मनपाच्या मैला उपसा वाहनावर काम करणाऱ्या 5 सफाई मित्रांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व सफाई मित्रांना सुरक्षा साधने वापरण्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले. सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त स्मृती पाटील, तत्कालीन उपायुक्त चंद्रकांत आडके , आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे , पर्यावरण अभियंता अजित गुजराती, मलनिःसारण अभियंता तेजस शहा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.