कोरोनाचे नियम धाब्यावर, टिटवाळ्यात शाळेत बोलावून परीक्षा घेतल्याचा आरोप
X
कल्याण डोंबिवली परिसरात दररोज सुमारे ५०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. मात्र टिटवाळ्य़ात चक्क शाळाच भरवली गेली आणि शाळेत मोठय़ा संख्यने विद्यार्थी आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कायदेशीर करावाई केली जाईल असे महापालिकेचे म्हणणे आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसात जवळपास दहा हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. काही दिवसांपासून 800 ते 900 रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात काही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने आत्ता केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नवे निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहे. सगळ्य़ांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. तरीसुद्धा अनेकदा अशा घटना घडल्या आहे. ज्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती नियम मोडून स्वत:सह दुस:यांचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
टिटवाळा येथील मांडा परिसरात रविंद्र विद्यालयात गेल्या दोन दिवसापासून शाळा भरविली जात आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्याथ्र्याची परिक्षा घेतली जात आहे. ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांच्या मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवले जात आहे. असा आरोप पालकांनी केला आहे. ज्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला यादव यांच्याकडे विचारणा केली असता यादव यांनी शाळा बंदच आहे असा दावा केला. या प्रकरणात टिटवाळयातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. केडीएमसीत रुग्ण वाढत असतानाही शाळा भरविली जात आहे. ही दुदैवी बाब आहे.
सरकारकडून र्निबध लावले जातात. त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांना विचारणा केली असता शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले .