Home > News Update > मोपलवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप : चौकशी करण्याची प्रिती शर्मा यांची मागणी

मोपलवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप : चौकशी करण्याची प्रिती शर्मा यांची मागणी

मोपलवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप : चौकशी करण्याची प्रिती शर्मा यांची मागणी
X

Mumbai: मुख्यमंत्री सचिवालयातील माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी गुरुवारी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या (वॉर रूम) महासंचालकपदाचा राजीनामा दिला. मोपलवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे बोलले जाते. मात्र, प्रत्यक्षात भाजपकडून आगामी लोकसभा निवडणूक ते लढविणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्ती असलेल्या एका ‘मित्रा’शी संबंध बिघडल्याने मोपलवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती समोर आली होती. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी मोपलवार यांच्यावर घोटाळ्याचं आरोप केले आहे.


दरम्यान आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत की " काही लोक म्हणतात की राधेश्याम मोपलवार यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला तर काही लोक म्हणता भाजपमधून लोकसभा निवडणूकी लढवण्यासाठी राजीनामा दिला आहे. परंतू सत्य हे आहे की त्यांचे मोठे घोटाळे समोर आले आहे. समृद्धी महामार्गात अनेक मोठे प्रकल्प त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. त्यांनी मोपलवार यांच्या घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे स्विकारला राजीनामा

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गुरुवारी राधेश्याम मोपलवार यांनी आपला वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यातील मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. या वॉर रूमच्या माध्यमातून प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत आहे. महासंचालक या पदाची निर्मिती करून या वॉर रूमची सूत्रे मोपलवार यांच्याकडे देण्यात आली होती.


मोपलवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा

राधेश्याम मोपलवार हे परभणी अथवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची चाचपणी करीत असल्याचे सांगण्यात येते. यापैकी हिंगोलीची जागा शिंदे गटाकडे आहे. तर, परभणीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे या दोनपैकी एका ठिकाणाहून निवडणूक तयारी करता यावी म्हणून मोपलवार यांनी वॉर रूमचा राजीनामा दिल्याचे समजते.

Updated : 29 Dec 2023 1:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top