Home > News Update > अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
X

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्टपर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता.

पण विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

Updated : 8 Oct 2020 5:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top