SBI Alert: शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास राहणार बंद
X
भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ग्राहकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम असणार आहे. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience.#InternetBanking #SBI #YONO pic.twitter.com/3t09OhEfqf
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 7, 2021
तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवेचा समावेश आहे. ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. त्यानुसार तीन दिवस काही तास सेवा बंद राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
9 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत सेवा बंद राहिल. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध नसेल. दरम्यान यावेळी UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद असणार आहेत.