सावित्रीज्योती करंडक राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
X
फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे पँथर दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या स्मृतीदिन सोहळा नुकताच पार पडला. या स्मृतीदिन सोहळ्यानिमित्त संघर्ष फौंडेशन कोल्हापूर तर्फे सावित्रीज्योती करंडक विभागीय व राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्थेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत माध्यमिक गटात 191 व खुल्या गटात 162 एकूण 353 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
संघर्ष फौंडेशनचे संस्थापक चारुशीला जाधव व सिद्धार्थ जाधव यांनी दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा व फौंडेशनचे उपक्रम याविषयी मनोगत आपल्या प्रास्ताविकामधून व्यक्त केले. स्पर्धेला नामांकित व अभ्यासू परीक्षक उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी बोलताना लेखक, व्याख्याते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी संघर्ष फौंडेशनचं कौतुक केलं आहे.
"माणूस हा परिवर्तनवादी आहे. सध्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी संघर्ष फौंडेशनने पेलली आहे. "असे मत डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले
लोकप्रिय अभिनेते अंशुमन विचारे यांनी अनुभव कथन केले. लेखिका साहित्यिक दीपा देशमुख यांनी वक्तृत्वाविषयी मनोगत व्यक्त केले.
"कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी चिकाटी, सतत प्रयत्न आवश्यक आहेत" असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
विभागीय स्पर्धा निकाल
कोकण मुंबई विभाग माध्यमिक गट
संस्कृती म्हात्रे - प्रथम, सिद्धी घाडगे - द्वितीय, तनिष्का बागवे - तृतीय, उत्तेजनार्थ - शमिका चिपकर, हर्षाली पाटील
कोकण मुंबई विभाग खुला गट
पराग बद्रिके -प्रथम, सिद्धी नार्वेकर - द्वितीय., अमोल गोळे - तृतीय, उत्तेजनार्थ - यश पाटील, सविता वाळके
मराठवाडा विभाग माध्यमिक गट
पार्थ भेंडेकर -प्रथम, अनुसया कुलथे - द्वितीय, तृप्ती घाटे - तृतीय, उत्तेजनार्थ - शंभूराजे जळके, विशाल कांबळे,
मराठवाडा विभाग खुला गट
रेणुका धुमाळ प्रथम, संजीवनी सोमासे द्वितीय, मंदार लटपटे तृतीय, उत्तेजनार्थ -आरती पुरी, अश्विनी घुगे
विदर्भ विभाग माध्यमिक गट
ईश्वरी सुडके प्रथम, मयूर छबिले द्वितीय, चक्रधर पंजरकर व अर्णव कदम तृतीय विभागून, उत्तेजनार्थ - धनश्री चिंचोलकर, मृणाल काळे
विदर्भ विभाग खुला गट
वैष्णवी हागूने प्रथम, विषय गवळी द्वितीय, सोनल भिगवडे तृतीय, उत्तेजनार्थ - प्रतीक राऊत, सुप्रिया सिद्धापूरे, वैष्णवी ठाकरे
उत्तर महाराष्ट्र विभाग माध्यमिक गट
सिद्ध बाफना प्रथम, स्वानंदी ठाणगे द्वितीय, वृषांक जाधव तृतीय, उत्तेजनार्थ - सलोनी ठाकरे, नेहाला जोशी,
उत्तर महाराष्ट्र विभाग खुला गट
वृषभ चौधरी प्रथम, प्रज्वल नरवडे द्वितीय, स्वराली गोडबोले तृतीय, उत्तेजनार्थ - वृषाली घोडके, अपेक्षा लोखंडे, ऋतुजा गंगावणे
पश्चिम महाराष्ट्र विभाग माध्यमिक गट
जयश्री जाधवर प्रथम, प्रतीक खेडकर द्वितीय, स्मित प्रधान तृतीय, उत्तेजनार्थ - सत्यजित माळी, राजवर्धन काळे
पश्चिम महाराष्ट्र विभाग खुला गट
अक्षय इळके प्रथम, सिद्धेश मिसाळ द्वितीय, प्रणव जगताप तृतीय, उत्तेजनार्थ -मारुती साबळे, तेजस्विनी पाटील
राज्यस्तरीय माध्यमिक गट
विशाखा आरेकर - प्रथम, प्रसाद परळे द्वितीय, वृषांक जाधव, हर्षदा पवार व सिद्धी घाडगे - विभागून तृतीय, उत्तेजनार्थ - मयुरी कांबळे, वेदांत गावंडे, संस्कृती म्हात्रे, शमिका चिपकर, मयूर चबिले
राज्यस्तरीय खुला गट
सिद्धेश मिसाळ प्रथम, अक्षय ईळके द्वितीय, आशुतोष निकम तृतीय, उत्तेजनार्थ -प्रसाद जगताप, सुजित काळंगे, रोहन कवडे, शिवम माळकर, विवेक वारभुवन, रेणुका धुमाळ
राज्यस्तरीय माध्यमिक गटासाठी प्रथम रु. 5000/, द्वितीय रु. 3000/, तृतीय रु. 1000/.व राज्यस्तरीय खुल्या गटासाठी प्रथम रु. 10000/, द्वितीय रु. 5000/, तृतीय रु. 3000/, विभागीय खुल्या गटासाठी रु. 1000/, रु. 700/, रु. 500/ व विभागीय माध्यमिक गटासाठी रु. 700/, रु. 500/, रु. 300/याप्रमाणे रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
वैशाली जाधव, नागसेन जाधव, सचिन अकोलकर, अतुल रुकडीकर, सरोज रुकडीकर, संजय बोत्रे, अलका कारंजकर, सुनिल कारंजकर , प्रमोद मोहिते, सुहास चव्हाण, अक्षय जहागीरदार, रमजान मुल्ला, काजल काळे, ऋतुजा जगदाळे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. चारुशीला जाधव यांनी केले व आभार सिद्धार्थ जाधव यांनी मानले.