Home > News Update > "सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना हातकड्यांची चिपळी बनवून तुकारामांचे अभंग गायले": नरेंद्र मोदी

"सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना हातकड्यांची चिपळी बनवून तुकारामांचे अभंग गायले": नरेंद्र मोदी

सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना हातकड्यांची चिपळी बनवून तुकारामांचे अभंग गायले: नरेंद्र मोदी
X

स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. त्यांचे अभंग हे जेवढे भागवत भक्तासाठी महत्वाचे आहेत तेवढेच ते राष्ट्रनिर्मीतीसाठी महत्वाचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

मोदींच्या हस्ते देहूमधील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आज करण्यात आले. शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. "मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या", या ओळींनी भाषणाची सुरूवात केली.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. त्यांचे अभंग हे जेवढे भागवत भक्तासाठी महत्वाचे आहेत तेवढेच ते राष्ट्रनिर्मीतीसाठी महत्वाचे आहेत, असेही मोदींनी सांगितलं.

देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. भारत ही संतांची भूमी असल्यामुले हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करतोय. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केलं. भारताला गतीशील ठेवलं असं मोदींनी सांगितलं.

आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले.

देहूच्या या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप आहे. याच करणामुळे मी देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन करतो. मागील काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

कार्यक्रमात सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर अजित पवारांचे भाषण होईल, असे वाटत होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांचे भाषण अपेक्षितच होते. पण फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले. यावेळी मोदींनीही निवेदकाकडे पाहत अजितदादांच्या दिशेने हात केल्याचे दिल्याने अजितदादांनी भाषण टाळल्याचे दिसून आले.

ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला पण कळस झाले तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी सश्रद्ध आणि अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज निर्माण केला. त्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की ते कोणी मिटवू शकलं नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतलं.वारकऱ्यांमध्ये कोणीही मोठं नसते, कोणी छोट नसते, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हेच तर वारकरी संप्रदाय सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबा रायांच्याच मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Updated : 14 Jun 2022 5:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top