सारा जेकब यांचा NDTV मधून Signing off, 20 वर्षाचा प्रवास थांबवला
NDTV च्या सिनियर इडिटर सारा जेकब यांनी NDTV मधील 20 वर्षांचा प्रवास थांबवला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून NDTV मधून आपण राजीनामा देत असल्याची जाहीर केले आहे.
X
NDTV च्या सिनियर इडिटर सारा जेकब यांनी NDTV मधील 20 वर्षांचा प्रवास थांबवला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून NDTV मधून आपण राजीनामा देत असल्याची जाहीर केले आहे.
NDTV च्या अँकर आणि वरिष्ठ संपादक सारा जेकब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या गेल्या 20 वर्षापासून NDTV मध्ये काम करत होत्या. सध्या सारा या वी द पीपल हा शो होस्ट करत होत्या. मात्र त्यांनी ट्वीट करून NDTV तून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
सारा जेक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कालच्या रात्री मी NDTV चा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, डॉ. रॉय आणि राधिका रॉय यांनी भारतातील एक चांगली माध्यम संस्था म्हणून NDTV ची निर्मीती केली. त्याबद्दल आभार. दोन दशकभरात अनेक सहकाऱ्यांसोबत काम केलं. त्यांच्या अनेक आठवणी आहेत.
2001 ते 2023 पर्यंत रिपोर्टर ते स्वतःच्या शो पर्यंत NDTV ने अनेक संधी दिल्या. भारतीय टीव्ही वृत्त उद्योगाच्या भरभराटीच्या काळात NDTV केंद्रस्थानी होते. NDTV ने टीव्ही माध्यमात मानक प्रस्थापित केलं. याबरोबरच माझा NDTV तील प्रवास खूपच जादुई होता, असंही सारा जेकब यांनी म्हटलं आहे.
माझा 'वी द पिपल' हा शो खूप मिस करेल, असंही सारा जेकब यांनी म्हटलं आहे. तसंच मी NDTV मधून Signing off केलं असल्याचंही साराह जेकब यांनी म्हटलं आहे.
सारा जेकब यांनी NDTV मधून राजीनामा दिल्यानंतर एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सारा जेकब यांनी आपल्या शोमध्ये पंतप्रधान मोदी हे महिलांचा सन्मान करत होते, असं म्हटलं आहे.
Watch: From His Mother To Political Leaders, How PM Shows Respect Towards Women pic.twitter.com/NTERyWsUhk
— NDTV (@ndtv) May 22, 2023
अदानी यांनी NDTV चा ताबा घेतल्यानंतर अनेक वरिष्ठ पत्रकारांनी NDTV सोडली आहे. यामध्ये रवीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चॅनलच्या समूह अध्यक्ष सुपर्णा सिंह, चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अरिजित चॅटर्जी आणि चीफ टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट ऑफिसर कंवलजीत सिंह बेदी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर श्रीनिवासन जैन, निधी राजदान यांनीही NDTV ला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ आता सारा जेकब यांनीही NDTV मधून राजीनामा दिला आहे.