रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी दखल घेतली पाहिजे: संजय राऊत
X
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल व्यक्तव्य केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारला तोडगा काढणे शक्य होते. मात्र, केंद्र सरकारला हा विषय अधांतरी ठेवायचा आहे. बिहारमध्ये कृषी कायद्यासारख्या सुधारणा झाल्या होत्या. सध्या बिहारमध्ये धान्याचा भाव 900 रुपये इतका आहे, तर पंजाबमध्ये हाच भाव 1500 रुपये इतका आहे. मग आता बिहारमधील शेतकऱ्यांनी धान्य विकण्यासाठी पंजाबमध्ये जावे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?' असा सवाल दानवेंनी यावेळा केला.