Home > News Update > अजित पवार यांचा अजुन कंठ फुटायचा आहे - संजय राऊत

अजित पवार यांचा अजुन कंठ फुटायचा आहे - संजय राऊत

अजित पवार यांचा अजुन कंठ फुटायचा आहे - संजय राऊत
X

“आपण जे वागलो तो धर्म आहे, अधर्म नाही. महाभारताने आपल्याला सांगितलं की हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्ही केली ती कुटनीती आणि आम्ही केलं ते काय होतं?” असा सवाल राऊतांनी यावेळी विचारला.

पोहरादेवीचा अपमान करत आहेत

संजय राऊत म्हणाले की, “ठाण्यात काल हास्यजत्रेचे दोन शो पार पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री आणि फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे हे शो होते. शपथेबाबत किती खोटं बोलतात हे लोक. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली असा दावा केला जातोय. खरंतर हा पोहरादेवीचा अपमान आहे. मला सकाळपासून त्या समाजातील अनेकांचे फोन येत आहेत. देवेंद्र फडणवीस आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवीची शपथ कोणी खोटी घेत नाही. हे जागृत देवस्थान आहे. पण हे सर्व खोटारडे लोक पोहरादेवीला खोटे पाडतात”, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांना कंठ फुटायचाय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण किती खोटारडे आहोत हे त्यानी दाखवून दिलं आहे. काल काय बोललो, आज काय बोललो याचं भान त्यांना नसतं. कोणत्या नशेत आहेत हे? यांना कोणती भांग कोणी पाजली हेच कळत नाही. लोकमान्य टिळक म्हणायचे एक आण्याची भांग प्यायल्यावर खूप कल्पना सूचतात. तसेच हे कोणती भांग प्यायले माहीत नाही. फडणवीस, शिंदे मिंधे खोटं बोलत आहेत. अजित पवारांना अजून कंठ फुटायचा आहे. त्यावर बोलूच. पण मला त्यात पडायचं नाही, अशी टीका राज्याचा महायुती सरकारवर करण्यात आली आहे.


Updated : 14 July 2023 3:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top