Home > News Update > युपीएच्या विस्ताराचे संजय राऊत यांचे आवाहन, शरद पवारांसाठी बॅटिंग

युपीएच्या विस्ताराचे संजय राऊत यांचे आवाहन, शरद पवारांसाठी बॅटिंग

युपीएच्या विस्ताराचे संजय राऊत यांचे आवाहन, शरद पवारांसाठी बॅटिंग
X

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचा विस्तार करण्याचे आवाहन केलेले आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकार विरोधात विरोधकांची ताकद कमी पडते आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भक्कम नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वापुढे यूपीएने एकत्रितपणे येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. यूपीएचा भाग नसलेल्या पण भाजप विरोधात लढणाऱ्या देशभरातील अनेक पक्षांनीही मोदींचा विरोध कायम ठेवलेला आहे, अशा सर्व पक्षांना युपीएमध्ये आणण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. 2004 मध्ये काही पक्ष मिळून संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापना करण्यात आली होती. यामध्ये सध्या 11 राजकीय पक्ष आहेत पण गेल्या काही वर्षांमध्ये नऊ प्रमुख पक्ष यूपी एमधून बाहेर पडलेले आहेत. कमजोर विरोधी पक्ष हा लोकशाहीसाठी चांगला नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्यामुळेच भाजपाच्या हुकूमशाही वादी भूमिकेला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर यूपीएच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवारांसारखा एक राष्ट्रीय नेता योग्य ठरू शकतो असे देखील मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. सोनिया गांधी यांचेही कौतुक करत त्यांनी अडचणीच्या काळात यूपीएचे नेतृत्व केलं असं देखील संजय राऊत म्हटले. पण सोनिया गांधीं शिवाय राष्ट्रीय स्तरावर ज्यांना स्वीकारले जाईल असे आणखी एक नाव म्हणजे शरद पवार आहेत असेदेखील संजय राऊत यांनी म्हटले आहे

Updated : 27 Dec 2020 8:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top