हिंदू धर्मातही ओवैसी निर्माण केले जात आहेत, राज ठाकरेंचे नाव न घेता संजय राऊत यांनी टोला लगावल्याची चर्चा
राज ठाकरेंना (Raj Thackeray) भोंग्यावरून घेतलेल्या भुमिकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
X
राज्यात मनसे विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यातच मनसेने शिवसेना भवनसमोर आधी भोंगे आणि त्यानंतर बॅनर लावल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यातच राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून संजय राऊत (Sanjay raut) यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, भाजप त्यांचे काम नवहिंदूत्ववादी एमआयएम आणि नवहिंदू ओवैसी यांच्याकडून करून घेत आहे. मात्र यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना नवहिंदूत्ववादी एमआयएम आणि नवहिंदू ओवैसी म्हटले असल्याची चर्चा होती. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना नवहिंदूत्ववादी एमआयएम आणि नवहिंदू ओवैसी म्हटले जात असल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, मी कोणाचेही नाव घेतले नाही. मी फक्त एवढंच म्हणालो की, उत्तरप्रदेशमध्ये ज्याप्रमाणे ओवैसींचा वापर करण्यात आला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नवहिंदूत्ववादी ओवैसींचा वापर सुरू आहे. या नवहिंदू ओवैसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे, फुट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता जागरुक आहे. हे अशा प्रकारचे डाव महाराष्ट्रातील जनता उधळून लावेल, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी