जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च पण शिंदेंना बाळासाहेबांचा विसर- संजय राऊत
X
निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येतो. मात्र मुख्यमंत्री पदाच्या सर्व्हेसंदर्भातील जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली. मात्र या जाहिरातींवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब असल्याने संजय राऊत (Sajay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येतो. मात्र मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रसिध्द झालेल्या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच प्रथम पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ही जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो आहे. मात्र त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut Criticize to Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले आहेत की, कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली ही जाहिरातबाजी. या आनंदाच्या क्षणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडला आहे. आम्हीच
शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकायला यांची तंतरली.
मोदी शहांचे इतके भय? बाकी ते सर्व्हे, फडणविस हे तुमचे चघळायचे विषय. बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली हे मान्य करा. ये पब्लिक हैं, सब जानती है, म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाहिरातीवरून टीका केली.