`समीर वानखडे` प्रकरण तपासासाठी केंद्रीय संस्थाकडे जाण्याची शक्यता
X
गेले काही दिवस देशभर चर्चा असलेल्या आर्यन खान ड्रग प्रकरणात आज मोठा खुलासा झाल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे अडचणीत आल्याचे दिसत आहे. याबाबत आता एनसीबीकडून प्रसिध्दीपत्रक देण्यात आले असून यासंबधीच्या आरोपाच्या तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांनी घेतला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कशाप्रकारे सर्वांना पकडलं याची माहिती बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने दिली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरवातीपासूनच वानखेडेंसोबत होता. तसंच कशा प्रकारे आर्यन खानसह इतरांना पकडण्यात आलं. याची सर्व माहिती त्याने व्हिडीओ आणि प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.
या खुलाशानंतर मोठा भुकंप झाला असून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी या आरोपाचे उत्तर दिले जाईल असं सांगितलं होतं.
त्यावर एनसीबीच्या झोनल कार्यालयातून विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांच्या सहीचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आलं आहे.
यामधे त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र वाचायला मिळाले. वास्तविक या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं त्यांनी प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करायला हवं होतं. या प्रतिज्ञापत्रातील आरोपांचा विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी इन्कार केला असला तरी प्रतिज्ञापत्रातील काही तपास प्रक्रीयेतील आरोपांबाब तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्यन खान प्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एसआयटी गठीत करुन चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकंडे केली आहे. अद्याप राज्यसरकार, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून याबाबत कोणत्याही हस्तक्षेपाबाबत अधिकृत वक्तव्य किंवा आदेश जारी केलेला नाही.
मागील काळात देखील अनेकदा राज्यात घडलेली प्रकरणं भाजपच्या अंगाशी आल्यानंतर त्यांचा तपास केंद्रीय संस्थाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या खुलाशानंतर अनेक गोष्टी अडचणीच्या दिसत आहेत. त्यामुळे हे प्रकरण देखील आता केंद्रीय संस्थाकडून तपासले जाईल अशी शक्यता आहे.
याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर म्हणाले, समीर वानखेडेची केस सीबीआय कडे जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीसांना तपासाची संधी मिळेल असं वाटत नाही. एनसीबीने चौकशी सुरु केली आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या हाती काही लागेल असं वाटत नाही.
NCB ने प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. राज्य सरकारच्या हातात काही लागेल असं वाटत नाही. https://t.co/3h53kk0Keo pic.twitter.com/rYXZs9YTh3
— Ravindra Ambekar (@RavindraAmbekar) October 24, 2021