Home > News Update > भीमा कोरगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच नाव चार्जशीट मधून वगळलं

भीमा कोरगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच नाव चार्जशीट मधून वगळलं

भीमा कोरगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच नाव चार्जशीट मधून वगळलं
X

भीमा कोरेगाव(Bhima koregaon) प्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे(Sambhaji bhide) यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेच ठोस पुरावे नसल्य़ामुळे भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.या पत्रात संभाजी भिडे यांचे आरोपपत्रात नाव नसल्याचे म्हटले आहे. संभाजी भिडेंना वगळून ४१ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे

पुण्यातील (pune)शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली.दरम्यान कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर केला होता.

Updated : 4 May 2022 7:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top