संभाजी भिडेनी ओकलं विष, तिरंग्याला मानवंदना देणार नसल्याचं केलं वक्तव्य
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिध्द असलेल्या शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे याने थेट देशाच्या तिरंग्याचाच अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
X
सातत्याने वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामध्ये संभाजी भिडे म्हणाले, अकबराच्या जनानखान्यात जगणारी जोधाबाई आणि 15 ऑगस्ट 11947 ला बाहेर आलेली स्वातंत्र्य लक्ष्मी. तिच्या खांद्यावर भगवा झेंडा होता. पण गेल्या 75 वर्षांपासून तिरंग्याच्या जनानखान्यात आमची स्वातंत्र्यलक्ष्मी आहे, असं वक्तव्य केलंय. स्वातंत्र्यलक्ष्मीच्या खांद्यावर भगवा झेंडा का नाही? असं म्हणत यामुळेच हिंदू समाजाचा उद्धार झाला नसल्याचे वक्तव्य केलं.
15 ऑगस्टला देण्यात आपण तिरंग्याला मानवंदना देतो. पण ही मानवंदना कुणाला? तुमच्या शत्रूला, तुमच्या मारेकऱ्याला, असं म्हणत संभाजी भिडे याने थेट तिरंग्याचा अपमान केला.
पुढे बोलताना भिडे म्हणाला, शत्रूला मानवंदना देणारे राष्ट्र स्वतंत्र असूच शकत नाही. यापुढे तिरंगी झेंड्याला वंदन होऊच शकत नसल्याचे म्हणत संभाजी भिडे याने वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राष्ट्रीय प्रतिकांचा (National Flag Code) अवमान केल्याप्रकरणी संभाजी भिडेवर कधी गुन्हा दाखल करणार असा सवाल सध्या विचारला जात आहे.