मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी केले तालिबानचे अभिनंदन...
X
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानचं समर्थन करत त्यांचं कौतुक केलं आहे. "त्यांनी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याला पराभूत केले आहे."
मौलाना सज्जाद नोमानी यांनी 'आज तक' शी बोलतांना, अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबद्दल तालिबानचे अभिनंदन केले. 'हिंदी मुस्लिम त्यांना सलाम करतात.' असं देखील त्यांनी म्हंटल होतं.
"मी तालिबानला सलाम करतो. तालिबानने संपूर्ण जगातील बलाढ्य सैन्याचा पराभव केला आहे. या तरुणांनी काबूलच्या भूमीचे चुंबन घेतले आणि अल्लाहचे आभार मानले आहेत."
"पुन्हा एकदा ही तारीख आली आहे. एका नि:शस्त्र समुदायाने सर्वात मजबूत सैन्याला पराभूत केले आहे. ते काबुलच्या राजवाड्यात शिरले. त्याचा अंदाज संपूर्ण जगाने पाहिला आहे. त्यांच्यामध्ये गर्व किंवा अहंकार नव्हता. कोणतेही मोठे शब्द नव्हते. "
दरम्यान नोमानी यांच्या वक्तव्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड च्या सदस्यांच्या वैयक्तिक विधानांना बोर्डाशी जोडले जाऊ नये. असं त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने तालिबान और अफ़ग़ानिस्तान की राजनीतिक स्थिति पर कोई टिप्पणी नहीं की है। कुछ मीडिया चैनल बोर्ड के कुछ सदस्यों की निजी राय को बोर्ड का स्टैंड मानकर ग़लत बात पर बोर्ड को ज़िम्मेदार ठहरा रहे हैं। यह बात पत्रकारिता मूल्यों के विपरीत है। (1/2)
— All India Muslim Personal Law Board (@AIMPLB_Official) August 18, 2021
भारताच्या स्वातंत्र्याशी तुलना...
यापूर्वी, मंगळवारी उत्तर प्रदेशच्या संभल मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानने काबूलवर केलेल्या वर्चस्वाची तुलना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी केली होती.
दरम्यान, बर्क यांनी पत्रकारांशी साधलेल्या संभाषणामध्ये म्हंटल होतं की, "जेव्हा आपला देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता, तिथे सुद्धा अमेरिकेने कब्जा केला होता, त्यामुळे ते ही आपला देश स्वतंत्र करू पाहत होते. मात्र, तालिबान ही एक शक्ती आहे. त्यांनी अमेरिकेला तिथे त्यांचे पाय रोवू दिले नाहीत." मात्र बर्क यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केला. त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले आहेत.