Home > News Update > सोमवारपासून सलून उघडणार, असे असतील नियम

सोमवारपासून सलून उघडणार, असे असतील नियम

सोमवारपासून सलून उघडणार, असे असतील नियम
X

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारपासून ही सलून दुकानं अटी शर्थींसह सुरू होणार आहेत

सलून चालकांसाठी नियम

# फक्त - हेअर कट, हेअर कलर, वॅक्सिंग आणि थ्रेडिंगला परवानगी

काम करणाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ज आणि गाऊन घालावा

प्रत्येक सर्व्हिसनंतर चेअर सॅनिटाईज करणं बंधनकारक

काॅमन एरिया आणि वाॅशरूम २ तासांनंतर धुवाव्यात

ग्राहकांसाठी diapossable टाॅवेल आणि नॅपकिन वापरावेत

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता.

त्यामुळं या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलीय. आर्थिक अडचणीमुळं राज्यात 12 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं ही दुकानं सुरू करावी, हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्र्यांनी मांडला आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

Updated : 26 Jun 2020 6:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top