Home > Election 2020 > ‘गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिट्टू’

‘गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिट्टू’

‘गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिट्टू’
X

गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis) यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून भाजप पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपर्यंत वंचितच्या बाजूने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फक्त ४० जागांची ऑफर देणारे पडळकर आता भाजपच्या तिकिटावर बारामतीमधून अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरुद्ध रिंगणात उतरणार आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशी घोषणा केली आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakar) यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी "गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पिट्टू आहेत. भाजपच्या सल्ल्याने ते वंचितमध्ये आले आणि धनगरांची मतं काँग्रेसला मिळू द्यायची नाहीत असा तो आराखडा होता. आता त्यांचं वंचित मधील काम संपलं आहे. म्हणून त्यांना पुन्हा भाजपात बोलावलं गेलं आहे." अशी खोचक टीका केली आहे.

https://youtu.be/ClVXOlCEGjg

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) अनेकदा काँग्रेसनं (Congress) आम्हाला भाजपची बी टीम म्हटल्याचं स्पष्टीकरण द्यावं असा सूर लावला होता. आज पडळकर यांच्या भाजप (BJP) पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने बोलताना सावंत यांनी या प्रकरणाचा संबंध जोडला. "आता पुन्हा पडळकर यांना भाजपात घेऊन धनगर समाजाची मतं घ्यायची आणि अजित दादांच्या विरोधात उभं करायचं असा कुटील डाव भाजपने आखला आहे. चंद्रकांत पाटील स्वतः बारामतीमधून उभे राहणार होते. मग आता भाजपचे प्रदेशाध्यक्षच घाबरले आणि २२० पार असं जे चित्र उभं केलं जातं ते किती खोट आहे हे दिसून येत.”

Updated : 30 Sept 2019 5:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top