Russia Ukraine War :पुतीन यांना धक्का! रशियन टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा
रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युध्दाचा जगभरातून विरोध केला जात आहे. त्यातच रशियातही पुतीन यांच्या या निर्णयाच्या विरोधात असंतोष आहे.
X
रशियाने पुकारलेल्या युध्दाला जगभरातून विरोध होत आहे. या युध्दाचा जगभरातून विरोध होत आहे. तर युक्रेनसह रशियन नागरीकांनीही युध्द नको, अशी भुमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यातच रशियन टीव्हीवर युक्रेनमध्ये निर्माण झालेली परिस्थिती दाखवण्यात येत होती. मात्र सरकारने हे कव्हरेज बंद करण्यास सांगून रशियन टीव्हीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सरकारच्या आदेशावर नाराजी दर्शवत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा पुतीन यांना मोठा धक्का मानला जात आहे.
रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. या युध्दाला जगभरातील देशांसह युक्रेन आणि रशियातूनही विरोध होत आहे. लोक रस्त्यावर उतरुन नो वॉर, स्टॉप वॉरच्या घोषणा देत आहेत. या परिस्थितीत रशियन टीव्ही या रशियन वृत्तवाहिनीवर युक्रेनमधील युध्दाचे कव्हरेज दाखवले जात होते. मात्र अधिकाऱ्यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे कव्हरेज प्रसारित करण्यावर बंदी घातली. त्यामुळे रशियन टीव्हीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, असा दावा व्हायरल व्हिडीओत करण्यात आला आहे.
यासंदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रशियन टीव्हीच्या कर्मचाऱ्यांनी युध्द नको अशा घोषणा दिल्याचा आवाज येत आहे. तर त्यांनी युध्द नको अशी भुमिका घेत राजीनामा देऊन स्टुडिओ सोडला, असे व्हिडीओत म्हटले आहे. तर कर्मचाऱ्यांनी स्टुडिओ सोडल्यानंतर स्वान लेक बॅले हा व्हिडीओ दाखवला. ज्या व्हिडीओला रशियात विशेष महत्व आहे. कारण 1991 मध्ये सोव्हियत युनियनचे पतन झाल्यानंतर रशियातील सरकारी चॅनलवर हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता.
रशिया युक्रेन युध्दाच्या पार्श्वभुमीवर रशियाच्या अभियोक्ता जनरलने देशाच्या मीडिया वॉचडॉग या चॅनलवर बंदी घातली होती. त्यानंतर ऐतिहासिक रेडिओ स्टेशन म्हणून ओळख असलेले एको मॉस्कवी हेसुध्दा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रशियात माध्यमांची गळचेपी पहायला मिळत आहे.
रशियात माध्यमांवर बंदी घातल्याच्या प्रकाराबद्दल बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिरेकी आणि हिंसक कृत्यांना आवाहन करणारी माहिती माध्यमांकडून प्रसारीत करण्यात येत होती. त्यामुळे या चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच रशियाच्या विरोधात आणि रशियन लष्कराबाबत चुकीची माहिती या चॅनलद्वारे प्रसारित करण्यात येत होती. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली. मात्र एकीकडे माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. तर माध्यम कर्मचाऱ्यांना परदेशी एजंट म्हटले जात आहे, त्यामुळे माध्यमांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.