Russia Ukraine War : रशियाने साडेपाच तास युध्द का थांबवले?
X
रशिया युक्रेनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युध्द सुरु आहे. या युध्दात अनेक नागरीकांचा बळी जात होता. त्यापार्श्वभुमीवर युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडली. या चर्चेच्या दुसऱ्या फेरीतील चर्चेनंतर रशियाने साडेपाच तास युध्द थांबवण्याची घोषणा केली.
रशिया आणि युक्रेन युध्द सुरू आहे. या युध्दामुळे हजारो नागरीकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनची राजधानी कीव्ह, खारकीव्ह आणि सुमी शहरांसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस पहायला मिळाला आहे. त्यापार्श्वभुमीवर जगातील बहुतांश देशांनी रशियाच्या विरोधात भुमिका घेतली. तर या रशिया युक्रेन संघर्षात भारताने अलिप्ततावादी भुमिका घेतली. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनमधील युध्दग्रस्त भागातील सामान्य नागरीकांना सुरक्षित कॉरिडॉर तयार करून देण्यासाठी रशियाने युक्रेनमध्ये साडेपाच तास बाँबहल्ले करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या चर्चेची दुसरी फेरी पार पडली. यामध्ये युक्रेनमधील नागरीकांची होणारी ससेहोलपट लक्षात घेता युक्रेनमधील नागरीकांना युध्दग्रस्त भागातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर निर्माण करण्याची भुमिका घेतली आहे. तर या चर्चेच्या फेरीनंतर रशिया युक्रेनमधील नागरीकांना बाहेर काढण्यासाठी साडेपाच तास युक्रेनवर कोणत्याही प्रकारचे बाँबहल्ले करणार नसल्याचे सांगितले आहे.
रशिया आणि युक्रेन युध्दामुळे जगाचे टेन्शन वाढले होते. तर यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बहुतांश देशांनी रशियाच्या विरोधात भुमिका घेतली होती. तर यामध्ये भारत तटस्थ राहिला होता. या बैठकीनंतर जगभरातील देशांनी रशियावर कठोर निर्बंध घातले होते. मात्र त्यानंतरही रशियाने युक्रेनवरचे हल्ले थांबवले नव्हते. अखेर चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर रशियाने युक्रेनमधील नागरीकांना सुरक्षित बाहेर काढण्य़ासाठी साडेपाच तास युध्दबंदीची घोषणा केली. त्यामुळे युक्रेनमधील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
रशियाने घेतलेल्या या निर्णयाबरोबरच चर्चेतून मार्ग निघण्यास सुरुवात झाल्यामुळे युध्दाचे ढग निवळण्याची शक्यता वाढायला सुरुवात झाली आहे.