Russia Ukraine War : रशिया युक्रेनच्या "या" दोन शहरांवर हल्ले करणार नाही
X
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने दोन शहरात युद्धविरामाची घोषणा केली आहे. मारियापोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांवर रशिया आता हल्ला करणार नाही. युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांसह इतर देशांतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
युक्रेन - रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. रशियन सरकारने मानवतेच्या आधारावर नागरिकांना सुविधा देण्यासाठी ही घोषणा केली आहे. रशियातील स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजल्यापासून युक्रेनमधील या दोन शहरांमध्ये युद्ध थांबवल जाईल. मीडिया एजन्सी स्पुतनिकने रशियाच्या वतीने ही माहिती दिली आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, युक्रेनमधील मारियापोल आणि वोल्नोवाखा शहरांमधील लोकांच्या होत असलेल्या असुविधांमुळे या शहरावर हल्ले करणार नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा दरम्यान हा दिलासा मानला जात आहे. भारतीय वेळेनुसार ११ वाजून ३० मिनिटांनी हा युद्धविराम जारी झालेला आहे.