Ukraine Russia War: UN मध्ये भारताने रशियाच्या विरोधात मतदान का केले नाही?
X
रशियाने युक्रेन वर केलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात आहे. यूक्रेनमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघटनेत रशियाच्या या कृतीविरोधात ठराव मांडण्यात आला होता.
या ठरावा संदर्भात घेण्यात आलेल्या मतदानात भारताने भाग घेतला नाही. भारताच्या या भूमिकेचे जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रशिया हा भारताचा परंपारिक मित्र आहे. मात्र, रशियाच्या या कृतीचं भारताने समर्थन केलेले नाही. तसंच विरोधात देखील भूमिका घेतलेली नाही. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे भारतात देखील मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
भारताने का घेतली मतदानापासून बाहेर राहण्याची भूमिका? संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचे स्थायी प्रतिनिधि टीएस तिरुमूर्ति यांनी या संदर्भात बोलताना सांगितले…
सर्व मतभेद आणि वाद हे चर्चेने मिटायला हवे. यासाठी कुठनितीचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी संवाद हेच माध्यमं आहे. यावेळेला ते कठीण वाटत आहे. उभय देशांनी कुटनितीचा मार्ग सोडला आहे. ही खेदाची बाब आहे. आपल्याला पुन्हा कुटनितीच्या मार्गावर येणे गरजेचं आहे. भारत युक्रेन आणि रशिया मधील परिस्थिती ने अत्यंत चिंतीत आहे. आमचं आवाहन आहे की, आता सर्व प्रयत्न हिंसा आणि शत्रुत्व तात्काळ थांबवण्यासाठी व्हावेत. असं मत तिरूमूर्ती यांनी व्यक्त केलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेत पार पडलेल्या या मतदानात यु्क्रेनच्या बाजूनं 11 मत पडली तर चीन, भारत आणि संयुक्त अरब अमीरात मतदान भाग घेतला नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेत स्थायी सदस्य असलेल्या रशिया ने व्हिटो चा वापर केल्याने हा ठराव पास होऊ शकला नाही.