ग्रामीण महाराष्ट्रातील हिंदू- मुस्लिम सलोख्याच्या यात्रा
राज्यात भोंगा आणि हनुमान चालीसेवरून राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे बीडच्या दौलावडगाव गावामध्ये हजरत सय्यद नसरुद्दीन शहा यात्रेच्या निमित्ताने, गावखेड्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा चर्चेत आली आहे.
X
कोरोनाच्या 2 वर्षाच्या खंडानंतर आता ग्रामीण भागातील यात्रा आणि उत्सव मोठया उत्साहात साजरज होत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या दौलावडगाव येथील, हजरत सय्यद नसरूदीन शहा यात्रेनिमित्त, हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीत मोठ्या उत्साहात यात्रांमध्ये सहभागी होत आहेत. संदल,तमाशा,भव्य कुस्ती स्पर्धा होत आहेत. कव्वालीचा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.
या यात्रेदरम्यान हिंदू - मुस्लीम बांधव एकत्रीत येऊन, नसरूदीन शहा यांच्या दर्ग्यात चादर चढवतात. यावेळी सर्व मुस्लिम व हिंदू बाधवांच्यावतीने हनुमान मंदीरात मारुतीला पुष्पहार अर्पण करण्यात येतो. दौलावडगाव येथे तीन दिवस यात्रा उत्सव पार पडतो.
एकीकडं राज्यात भोंगा आणि हनुमान चालीसावरून राजकारण केले जात आहे. दोन धर्मात तेढ निर्माण होईल असं वातावरण बनत चाललं आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात, आजही हिंदू-मुस्लीम भाई भाई म्हणत नागरिक सण
उत्सव साजरे करत आहेत राहत आहेत. ग्रामीणतील यात्रा उत्सव असेल तर सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे दर्ग्यावर हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत चादर चढवतात, तर गावातील हनुमान मंदिरात एकत्रित येत पुष्पहार देखील अर्पण करतात. यामुळे राज्यातील राजकारण्यांनी ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.