सावधान ! गावात बालविवाह होत असेल तर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या पदाला धोका
गावात बालविवाह होत असेल तर सरपंच, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे.
X
गावात बालविवाह होत असेल तर सरपंच, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. तुमच्या गावात बालविवाह होत असेल तर ग्रामसेवक, सरपंच आणि पोलिस पाटील यांच्या पदांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाने शिफारस केली आहे.
गावात बालविवाह (Child Marriage) होत असल्यास त्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांच्यावर दोषारोप झाल्यास त्यांचं पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे. यासंदर्भात जालना (Jalna) दौऱ्यावर असताना रुपाली चाकणकर या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, यापुर्वी महिला आयोग 2008 च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार यापुर्वी बालविवाह लावणारे कुटूंब, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक यांच्यावर गुन्हा दाखल करत होता. मात्र सध्या वाढत्या बालविवाहाच्या आकडेवारीमुळे (Increase Child Marriage) या कायद्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे गावात बालविवाह होत असेल तर त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांचे पद रद्द करण्याची शिफारस केली असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.