Home > News Update > आरएसएसची सुरक्षा आता सीआयएसएफ करणार...

आरएसएसची सुरक्षा आता सीआयएसएफ करणार...

..ज्या आरएसएस मध्ये संरक्षणाचे धडे दिले जातात. त्या संघ मुख्यालयाला सीआयएसएफचं सुरक्षा कवच..

आरएसएसची सुरक्षा आता सीआयएसएफ करणार...
X


ज्या आरएसएस मध्ये संरक्षणाचे धडे दिले जातात. त्या आरएसएसची सुरक्षा पूर्णपणे सीआयएसएफकडे (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) कडे सोपवण्यात आली आहे. RSS प्रमुख मोहन भागवत यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. दुसरीकडे देशातील सर्व विमानतळांवरून सीआयएसएफची सुरक्षा काढून खाजगी कंपन्यांना देण्यात आली आहे. विमानतळाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असताना विमानतळावर खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याचा अर्थ भारताच्या सीआयएसएफ पेक्षा खाजगी सुरक्षा रक्षकांची गुणवत्ता अधिक आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या अगोदरच 'Z+' सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. जून 2006 मध्ये, लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या तीन दहशतवाद्यांनी नागपुरातील RSS मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर सरकारने संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवली होती.

दरम्यान सीआयएसएफ अधिकार्‍यांसह सुमारे 150 जवान सोमवारी संध्याकाळी संघाच्या नागपूर मुख्यालयाच्या ठिकाणी आणि दिल्लीतील संघाचं मुख्य ठिकाण असलेल्या झंडेवालान येथे पोहोचले. सीआयएसएफ च्या जवानांनी गेल्या 15 वर्षापासून सुरक्षा देणाऱ्या आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांकडून चार्ज घेतला.

नागपूर आणि झंडेवालन येथील सीआयएसएफच्या सुरक्षेची जबाबदारी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. नागपूरमधील सीआयएसएफ चे जवानाची राहण्याची व्यवस्था नागपुरातील मुख्यालयाजवळील एका शाळेत करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसापुर्वी नागपूर आणि झंडेवालन कार्यालयाचे सिक्युरिटी ऑडिट केलं होतं. या ऑडिटनंतर संघाच्या दोन्ही कार्यालयांची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. सीआयएसएफ तयार करण्यामागचा खरा उद्देश वेगळा होता, परंतु सीआयएसएफच्या जवानांना वेगळ्या कामांमध्ये तैनात केलं जात आहे. सीआयएसएफ च्या उद्देश औद्योगीक भागात सुरक्षा व्यवस्था प्रदान करणं हा होता. मात्र, आता सर्रास सीआयएसएफचा वापर राजकीय व्यक्तींना सुरक्षा देण्यासाठी केला जातो.

Updated : 6 Sept 2022 4:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top